साने गुरुजी विद्यालय येथे इंधन संरक्षण जागृती कार्यक्रम

साने गुरुजी विद्यालय येथे इंधन संरक्षण जागृती कार्यक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : पीसीआरए (PCRA) द्वारा इंधन जागृती कार्यक्रम ब्रह्माकुमारीस एज्युकेशनल सोसायटी व स्वरांजली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी विद्यालय येस्तार ता.अहमदपूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी केदार खमितकर यांनी विद्यार्थ्यांना इंधन बचतीसाठी मार्गदर्शन केले. इराण आणि इराकसारख्या देशांमध्ये नैसर्गिक स्त्रोत असलेले इंधनाचे साठे जरी सध्या मुबलक प्रमाणात असले आणि याच देशांकडून जगभरातील अन्य देशांना आवश्यक असलेल्या इंधनाचा पुरवठा होत असला तरी निसर्गाचे हे स्रोत कधी ना कधी संपुष्टात येणारच आहेत. हे स्रोत आता आटू लागलेले आहेत. म्हणूनच आता उपलब्ध असलेल्या इंधनाची अत्यंत गांभीर्याने बचत करणं, ही काळाची आणि मानवी जगण्याची देखील गरज बनलेली आहे तेंव्हा वाचवू इंधन, करू पर्यावरण रक्षण असे केदार खमितकर यांनी उपस्थितांना आवाहन केले. विद्यालयाचे मुख्याधापक सुनील जाधव अधाक्षतहानी होते.प्रमुख पाहुणे राजयोगिनी ब्रह्मा कुमारी छाया दीदी, बालाजी ढाकणे होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलनाने करण्यात आले. संगीत शिक्षक बसवेश्वर थोटे यांनी स्वागत गीत सादर केले.

राजयोगिनी ब्रह्मा कुमारी छाया दीदी यांनी मूल्यशिक्षणावरती विद्यार्थीं विद्यार्थिनी यांच्याशी सवांद साधला. आपण सर्वांनी मिळून अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट ऊर्जेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होणार असल्याचे छाया दीदी यांनी ऊर्जा बचतीसाठी आवाहन केले. विद्यार्थी विद्यार्थिनी या राष्ट्रीय अभियान मधे सहभागी झाले.राजयोगिनी ब्रह्मा कुमारी छाया दीदी यांनी उपस्थित विद्यार्थीं विद्यार्थिनी इंधन संवर्धन प्रतिज्ञा करून घेतली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी सुनील जाधव म्हणाले की,इंधनाची बचत केली पाहिजे.राष्ट्रीय संपत्ती जपली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव किडे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ.वनिता वाडीकर तर आभार विवेकानंद मठपती यांनी मानले. यावेळी उपस्थित विद्यार्थीं विद्यार्थिनी यांनी शासनाच्या कोवीड-१९ नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमराम दत्ता,सुर्यवंशी धनाजी,बिरादार दयानंद,पांडे किरण,शेख शब्बीर आदिनी परिश्रम घेतले.

About The Author