ग्रॅड स्लम टर्फ च्या माध्यमातून क्रिडा क्षेत्रात होणार लातूर पॅटर्न ची ओळख…
लातूृर (प्रतिनिधी) : लातूर येथील राजस्थान हायस्कूलच्या मैदानावर उद्योजक आशिष सोमानी यांच्या संकल्पनेतून ग्रँड स्लम टर्फ ची निर्मिती. लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणुन लातूरची ओळख आहे. आता खेळामध्ये मध्ये पण लातूर पॅटर्न ची ओळख होईल असे प्रतिपादन ग्रॅड स्लम टर्फ चे उध्दघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले. प्रमुख पाहुणे लातूचे पोलीस अधिक्षक निखील पिगळे, लक्ष्मीनारायण लाहोटी, शैलेश लाहोटी, अॅड.अशिष बाजपाई, फाउंडर संचालक डॉ. हरिप्रसाद सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की ग्रॅड स्लम टर्फ मध्ये लहान मुलांच्या आयपील सारख्या स्पर्धा घेता येतील, तसेच मुलांना नवनवीन खेळा मध्ये भाग घेता येईल, यामध्ये फुटबॉल, झुंबा, फुटबॉल, क्रिकेट, योगासन असे प्रकार स्लम टर्फ मध्ये आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेले प्रशिक्षकांची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली आहे.असेही सोमानी यांनी सांगितले मनोगत 7व्यक्त करतांना पोलिस अधिक्षक़ म्हणाले की कुठल्याही दिशेने प्रगती करायची असेल तर आधी स्वप्ने बघीतली पाहिजेत . त्यानंतर त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने याचा फायदा नक्कीच मुलांना होणार आहे. तसेच लातूृर शहराला नविन स्वप्न देण्याच काम सोमाणी कुटुंबानी केल असल्याचे ते म्हणाले. यावेळी लक्ष्मीनारायण लाहोटी यांनी ही मनोगत व्यक्त केले. लातूरात पहिल्यांदाच सोय टर्फ चे मुख्य आशिष सोमाणी यांनी लातूर मध्ये पहिल्यांदा अशिष सुविधा असल्याचे सांगितले. या ठिकाणी लहान मुला बरोबर ते मोठया प्रर्यत सगळया सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी मिनी फुटबॉल स्पर्धा घेण्यासाठी ही सगळी सुविधा उपलब्ध आहे.कार्यक़्रमाचे प्रास्ताविक टर्फ चे मुख्य आशिष सोमाणी यांनी केले. औरगांबाद, पुणे, हैद्राबाद, मुंबई या ठिकाणी असे आहे.