शिवशाही प्रतिष्ठान चे चालते फिरते अन्नछत्र

शिवशाही प्रतिष्ठान चे चालते फिरते अन्नछत्र

भाविक भक्तांचा लातूर ते तुळजापूर मार्गावर उदंड प्रतिसाद

लातूर (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षांपासून शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अन्नछत्र भाविक भक्तांसाठी आयोजित केले जाते. गेल्या पाच वर्षापासून अन्नछत्राची ही परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे. आतापर्यंत हजारो पायी जाणाऱ्या व येणार्या भाविक भक्तांसाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नदानाचे महान कार्य करून समाजकार्य करण्याचे काम शिवशाही प्रतिष्ठान चे अध्यक्ष परमेश्वर घुटे यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात येते आहे. कोरोना परिस्थितीमुळे या वर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने चालते फिरते अन्नछत्र राबवून लातूर ते तुळजापूर मार्गावर पायी येणाऱ्या-जाणाऱ्या शेकडो भाविक भक्तांसाठी अन्नदानाची सोय करून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने जपली आहे. या अन्नदान कार्यक्रमास मोठ्या उत्साहाने भक्तांचा प्रतिसाद मिळाला.

शिवशाही प्रतिष्ठान चे चालते फिरते अन्नछत्र

उत्साहाच्या वातावरणात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य तसेच भाविक भक्त यांच्यासह लातुर ते तुळजापुर पर्यंतचा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला. यामुळे शिवशाही प्रतिष्ठान लातूरचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी अन्नछत्र रथाचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विधिवत पूजा करून रथ तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला. यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष परमेश्वर घुटे शिवसेना शहर प्रमुख रमेश मामा माळी, लातूर मिशनचे संपादक भारत जाधव, सुरेश कचबावार, दयानंद माने, शंकर जाधव, अजित माने, संतोष मगर, संदीप जाधव, तानाजी घुटे, अजित दुटाळ, बालाजी पवार, महालिंग तटाळे, कैलास चव्हाण, महेश सोमवंशी, शुभम चव्हाण, शरद घुटे, संपत भिसे, संतोष मगर, ओमकार सरडे, विकास भंडे, ओम कोल्हे, सुशील सपकाळ, अमर घुटे, राजेश बंडगर, ओमकार डोंनगापुरे, योगेश मेटे, ऋषिकेश मोरे, उमेश भिसे, लखन सावंत, तुषार सूर्यवंशी, गणेश जमादार आदी मोठ्या संख्येने भक्तागण उपस्थित होते.

About The Author