भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख शेतकऱ्यांच्या औसा ते तुळजापूर पदयात्रेत सहभाग
अहमदपूर (गोविंद काळे) : लातुर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता राज्य शासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकर्यांसह तुळजापूर पर्यंत पायी यात्रा सुरू केली असून या पदयात्रेला समर्थन देण्यासाठी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी रविवारी दुपारी या पदयात्रेत सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.