सिद्धी शुगर अँड अलाईड इंड.लि. उजना साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन
अहमदपूर (गोविंद काळे) : सिद्धी शुगर अँड अलाईड इंड.लि. उजना ता.अहमदपूर साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या 10 व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प उत्तम महाराज धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब होते.
सन २०२१-२२ या हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत पूर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पूर्व तयारी करण्यात आलेली असून ट्रक, ट्रॅक्टर यांचे करार करण्यात आलेले आहेत. कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे पूर्णत्वास आली आहेत. तसेच 20 टक्के कर्मचारी पगार वाढ व 8.33 टक्के बोनस ही देण्यात येणार आहे.
सिद्धी शुगर कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा असे यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आवाहन केले
याप्रसंगी माजी सरपंच साहेबरावजी जाधव, व्यवस्थापकीय संचालक अविनाशभैया जाधव, विठ्ठलराव माकणे, सुरज पाटील, व्हाईस प्रेसिडेंट पी.जि.व्होनराव, युवराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीदादा देशमुख, जी. प. सदस्य माधवराव जाधव, उपसभापती तुकाराम पाटील, बळीराम भिंगोले गुरुजी, अंकुशराव कानवटे, बाबुराव पाटील, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, प.स. सदस्य गिरीशजी देशमुख, चेअरमन रावसाहेब भोसले, फिल्ड ऑफिसर रामदास देशमुख, प्राध्यापक द.मा.माने सर, प्रा.बाबुराव सैदापूर, उत्तमराव देशमुख दाजी, प्राध्यापक एन.डी. राठोड, वसंतराव शेटकर, चेअरमन बापूराव सारोळे, चेअरमन दीनानाथ राचमाळे, वामन पाटील, व्यंकटराव जांभळदरे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, ऍड.सादिक शेख, अविनाश देशमुख, संभाजी चोपने, बालाजी रोकडे, प्रतापराव जाधव, सतीश नवटक्के, संचालक श्याम देवकत्ते, शेषेराव चावरे, बळीराम माकणे, प्रा.व्ही.एस. पवार, गोपीनाथ जायभाये, नारायण दुर्गे, प्रकाश गरुरे, बालेश पौळ, हनुमंत पेड, व्यंकट वंगे, एकनाथ पेड, पी.एल.मीटकरी, डिसलरी मॅनेजर शिंदे, फॅक्टरी मॅनेजर कावळगुडेकर, कार्तिक घाटीवाले, शिवशंकर आगलावे, पंडितराव शिंदे, परमेश्वर तीरकमटे, चंद्रकांत देशमुख, युवराज बदने, सभासद, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.