राजकुमार सोमवंशीची भारतीय कृषि विमा कंपनीच्या जिल्हास्तरीय तक्रार समितीवर निवड

राजकुमार सोमवंशीची भारतीय कृषि विमा कंपनीच्या जिल्हास्तरीय तक्रार समितीवर निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : उमरगा यल्लादेवी विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजकुमार सोमवंशी यांची भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबईच्या लातूर जिल्हा तक्रार समितीवर सदस्यपदी निवड जिल्हाअधिकारी यांनी केली आहे. लातूर जिल्हा करिता पिक विमा घेण्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई ही कंपनी आहे. विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकर्‍यांच्या ज्या कांही अडचणी असतात त्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता जिल्हा स्तरीय कमेटी गठीत केली असून या कमेटीचे अध्यक्ष बी.पी.पृथ्वीराज जिल्हाअधिकारी, लातूर हे आहेत. तर सचिव डी.एस.गावसाने जिल्हा कृषि अधिक्षक आहे तर समितील सदस्य बी.यु.मंगरुळकर कृषि उपसचालक, लातूर, आर.एस. कदम उपविभागीय कृषि अधिक्षक, लातूर, एस.आर. चोले कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, लातूर, ए.व्ही.गुट्टे कृषि कृषि विद्यावेता कृषि महाविद्यालय, लातूर, डाॅ.एस.एस, डिग्रसे प्रमुख शास्त्रज्ञ कृषि लातूर, एन.पी.कांबळे तंत्र अधिकारी लातूर, संतोष भोसले भारतीय कृषी विमा जिल्हा प्रतिनिधी लातूर, राजकुमार सोमवंशी, चेअरमन विविध विकास सेवा सोसायटी, उमरगा यल्लादेवी ता. अहमदपूर असे एकुण दहा सदस्य जिल्हा स्तरिय तक्रार समितीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!