धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकाच्या बांधकाम जागेचे भुमीपुजन

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकाच्या बांधकाम जागेचे भुमीपुजन

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ आणि अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित 65 वा धम्मचक्र परिवर्तन दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ दि.15 आक्टोबंर रोजी सकाळी- 11: 45 वाजता साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इडिया आठवले गट या पक्षाचे राज्य सचीव बाबासाहेब कांबळे हे होते तर पंचशील ध्वजारोहण युवा नेते डाॅ सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील, भाजप नेते दिलीपरावजी देशमुख, कमलाकर पाटील,रामभाऊ बेल्लाळे, स्वामी रा.ति.वि.सिनेट स.प्राचार्य डाॅ.नारायण कांबळे, अॅड टि.एन.कांबळे, संगायो. चेअरमन शिवाजीराव देशमुख, कृ.ऊ.बा.स.सभापती शिवानंद हेंगणे अहमदपुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पो.का.आलापुरे, संगायो. सदस्य गोपीनाथ जोंधळे,शेख अफ्रोज, प्रकाश ससाणे,अॅड. निखिल कासनाळे, प्रा बालाजी आचार्य,जि.प.सदस्य माधव जाधव,निवृत्ती कांबळे, वसंत शेटकर,एम.बी.वाघमारे, धनंजय जाधव, नगरसेवक डाॅ.फुजैल जागीरदार,राॅ.का.श.अध्यक्ष अजहर बागवान,दत्तोबा कांबळे, श्रिकांत बनसोडे, व.ब.आ. जिल्हा.उपा.विनय ढवळे, ता.अध्यक्ष सहदेव होनाळे, पञकार ञीशरण मोहगांवकर, अजय भालेराव बाबासाहेब वाघमारे पठाण अफ्रोज, अशोक सोनकाबंळे, प्रशांत जाभाडे, सुजीत गायकवाड, चंद्रशेखर भालेराव, विष्णू पौळ, येतीराज केंद्रे मिलिंद गोदाम, के.एन.साबळे, प्रा सतिश ससाणे, विलास कांबळे, सतिश नवटक्के, अनिल तिगोटे, मनिष क्षीरसागर, बालाजी ढवळे, बजरंग गायकवाड, आशिष तोगरे, मुन्ना कांबळे, अनिश खुरेशी, नागनाथ गायकवाड, जाधव सर मा.नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, सौ.अंजलीताई वाघंबर, सौ.रशिका बनसोडे,सौ.कांताताई आचार्य, सौ.गायकवाड ताई, सौ.अश्विनी वाघंबर, मंगलबाई लामतुरे, सौ.शिल्पा गायकवाड, सौ.रमाताई ससाणे,सौ.लामतुरे, प्रभाताई तिगोटे, अॅड सतिश कांबळे, आजिंक्य बनसोडे, आदित्य ससाणे, वैभव बल्लोरे, शरद बनसोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकाच्या बांधकाम जागेची विधीवत पुजा करून नारळ फोडण्यात आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तत्पूर्वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर दुपारी 1: 30 वाजता लोकसम्राट, तालुक्याचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी काॅ. चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी पाटिल यांनी व भाजपा नेते दिलीपरावजी देशमुख यांच्या सहकारी मान्यवर कार्यकर्त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी उपस्थित मान्यवरांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज महात्मा फुले, छञपती शाहु महाराज, गौतम बुद्ध, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या जीवन चरिञावर व त्यांच्या कार्यावर भाषणे करून आपले विचार मांडुन 65 व्या धम्मचक्रपरिवर्तनदिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रास्ताविकपर भाषण या कार्यक्रमाचे संयोजक/निमंञक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले. हा कार्यक्रम कोविड चे सर्व नियम पाळून घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक / आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, संजय वाघंबर, सचिन गायकवाड, गौतम वाघंबर, श्रीरंग गायकवाड, शाहिर मारोती, प्रकाश रायबोले, शेख बाबु, आदित्या वाघंबर,सुमित वाघंबर, शेख कलीम,रितेश वाघंबर, अनिल वाघंबर, डाॅन वाघमारे, इत्यादी कार्यकर्त्यानी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सुञसंचालन जिवन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन दयानंद वाघमारे यांनी सर्वांचे मानले. यानंतर कार्यक्रम संपन्न झाला आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता दिवसभर येत होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!