कु. पूजा चव्हाण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम

कु. पूजा चव्हाण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम

अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२१ बी.ए. पदवी परीक्षेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूजा गोपीचंद चव्हाण ही९०.४०टक्के घेऊन गुणानुक्रमे सर्वप्रथम आली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये महात्मा फुले महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी तानाजी कांबळे हा विद्यापीठात सर्वप्रथम आला होता. त्याने भूगोल विषयात विद्यापीठाचे गोल्ड मेडलही प्राप्त केले होते. तर २०१८ मध्ये दीपाली परतवाघ ही विद्यार्थिनी विद्यापीठातून संस्कृत विषयात सर्व प्रथम आली व ती गोल्ड मेडलची मानकरी ठरली. तर २०१९ मध्ये कैलास ससाणे या विद्यार्थ्याने विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकाविला ; तसेच त्याने इंग्रजी आणि भूगोल विषयात विद्यापीठाचे गोल्ड मेडल पटकाविले. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात गुणवत्ता विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. तसेच त्यांना वेळोवेळी प्राध्यापकांचे अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन लाभते. त्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्तेचा नवा ‘ महात्मा फुले पॅटर्न ‘ निर्माण झाला आहे.

दरवर्षी महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकत असतात. या वर्षी पुन्हा एकदा पूजा चव्हाण या विद्यार्थिनीने विद्यापीठात सर्वप्रथम येऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यावर्षी महाविद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के लागला असून, सर्वच्या सर्व ४१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात चव्हाण पूजा गोपीचंद, शेख मिस्बा अलिमुद्दिन, मलकापुरे रेणुका पुंडलिक, नरवटे गणेश मोहन, गायकवाड तेजस्विनी अरुण, गवळे निकिता गणेश, मकापल्ले राणी माधवराव, सोनकांबळे प्रियंका अशोक, हौसे योगेश हनुमंतराव, भदाडे मंजुषा भास्कर, कांबळे पूजा भाऊसाहेब, भालेराव निखिल भैय्यासाहेब, कांबळे निखिल भानुदास, टोकलवाड शुभांगी नामदेव, सुरनर जया एकनाथ, गायकवाड रमाताई श्रीराम, तेलंगे संतोष संभाजी, देमगुंडे कुसुम खंडेराव, मेकाले हनुमंत बापूराव, रोडे नीलेश उत्तम, वाघमारे भाग्यश्री संतराम, राठोड कृष्णा मेहरबान, देशमुख पूजा केशवराव, भुतके वैष्णवी दगडू, सोळंके संभाजी वसंत, सुरनर प्रतिभा गिरीधर, नायने गोविंद नागनाथ, कराड प्रवीण केशव, लिंबले कविता राजाराम, लामतुरे वैभव मधुकर, सकनुरे प्रियंका अर्जुन, वाघमारे अमोल गौतम, बनसोडे अस्मिता लक्ष्मण, सावंत निकिता निवृत्ती, शिंदे अजित देवीदास, पिलवटे योगेश्वरी किशोर, शिंदे कुणाल बालाजी, सुरनर पवन शिवराज, कांबळे सुजाता दौलत, चारोळे कोमल दगडोबा आणि कराड पवनकुमार राजेंद्र या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पूजा गोपीचंद चव्हाण या विशेष गुणवंत विद्यार्थिनीचे आणि सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी आणि सर्व प्राध्यापक व कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author