पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार – लक्ष्मण अलगुले

पाणी प्रश्न लवकर न सुटल्यास तिरडी आंदोलन करणार - लक्ष्मण अलगुले

मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरामध्ये दर आठवड्याला एका वेळा नियमीत पाणी सोडणे व शहरातील पाईप लाईन मुळे व अतिवृष्टीमुळे गल्ली गल्लीत झालेले खड्डे तात्काळ दुरुस्ती करणे तसेच शहरात होणाऱ्या अस्वछतेमुळे व नाली अभावी डेंगु मलेरिया व इतर रोगराई होत असुन या गलथान कारभारावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अन्यथा नगरपरिषदे समोर तिरडी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी मुख्यअधिकारी यांना निवेदनातुन दिला आहे. शहरवासी हे गेली ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असुन सन २०१७ साली मंजूर असलेली कायम स्वरूपी पाणी पुरवठा यो योजना आज तागायत संपुर्णताहः आमलात आलेली नसुन शहरातील जनतेला नियमीय व सुरळीत पाणी येत नसल्यामुळे शहरातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . गेले कित्येक वर्षा पासून मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या माध्यामातून जनतेची दिशाभूल करून सोशल मिडीया व पेपर जाहिराती देवून ८ ते १० दिवसात पाणी सुरळीत करू तसेच विविध संघटना यांना लेखी उत्तरे देवून आपण आश्वासने दिलेली असून आपल्याकडून जनतेची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे .

शहराला पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे . जर आपणास पाणी सुरळीतपणे शहरास पुरवठा करणे होत नसेल तर पाणी सोडण्याच्या दिवसाला शहरी सन अथवा राष्ट्रीय सन म्हणून घोशीत करावे व शासनास सुट्टी जाहीर करण्याचा ठराव घेवून शहर वासियांना पाणी भरण्यासाठी सुट्टी मिळवून द्यावी . तसेच शहरातील पाईप लाईनमुळे व अतिवृष्टीमुळे गल्लोगल्लीत झालेले खड्डे बुजविण्यात आलेले नसुन जे बुजविण्यात आलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे काम केले असल्यामुळे तेथे पुण्हा खड्डे.पडले आहेत यामुळे शहरातील जनतेला अपघाताला सामोरे जावे लागत आहे .

मुख्यअधिकारी, नगराध्यक्षा, नगरसेवक यांची चुक असल्यामुळे शहरातील रहीवाशींचा अपघात विमा काढून त्यांना आपल्या मार्फत आर्थिक साह्य करावे तसेच शहरामध्ये नाली अभावी डेंगु मलेरीया यासारखी रोगांची साथ नागरिकांना होत असल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येत असुन नागरिकांना मानसिक व आर्थीक नुकसान सोसावे लागत आहे . सदरील गैरसोयींची लवकरात लवकर उपाय योजना करावी व शहरातील घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई होणाऱ्या नागरिकाना आपल्या मार्फत आरोग्य विमा काढून त्यांना आर्थिक साह्य करावे . अन्यथा दि . २५ आँक्टोंबर रोजी सदर प्रकरणी न.प. कार्यालय, अहमदपूर समोर तीव्रपणे तिरडी अंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावीअसे निवेदणात नमु करण्यात आले असुन निवेदण देताना शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, शिवसेना नगरसेवक संदिप चौधरी, अँड. स्वप्नील व्हत्ते,युवासेना तालुकाप्रमुख रामप्रसाद आय्या, युवासेना शहरप्रमुख लहु वाळके पाटील, प्रविणजी डांगे,गणेश मदने सर, सदानंद गोरे, गजानन मेनकुदळे, बालाजी बोरेवार, सुदर्शन पाटील, सुनिलजी डावरे, नगरसेवक अलीम सय्यद, रामा भिंगे,अजित सांगवीकर आदींची उपस्थिती होती.

About The Author