एस टी महामंडळ बसेस सुरू करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे

एस टी महामंडळ बसेस सुरू करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे

अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोणा काळात अहमदपूर तालुक्यातील सर्वच एस टी महामंडळ बसेस बंद होत्या त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस चालु झाल्या पण ग्रामीण भागातील अवशक असणाऱ्या जवळपास 25 च्या वर बसेस आर्णीग नसल्याच्या कारणावरून बंद आहेत त्यामुळे ग्रामीण भागातुन शहरांत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागतो, त्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सदर बसेस त्वरित चालु करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असे निवेदन एस टी महामंडळ आगारप्रमुख सोनवणे यांना देण्यात आले यावेळी सोबत सरपंच संघटनेचे महेशजी ढाकणे होते. यावेळी आगार व्यवस्थापक सोनवणे साहेब यांनी सांगितले की ज्या गावात विद्यार्थी पास घेतले जातील तेथील विद्यार्थ्यी शाळेत येतात असे लक्षात आल्यावर बसेस सुरू केल्या जातील तरी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व पालकांना, विद्यार्थ्यांनी पासेस काढून घ्यावे जेणेकरून बसेस सुरू होतील.

About The Author

error: Content is protected !!