श्रीमती.बालिका मुळे यांची महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील संस्कार विद्यालयात कार्यरत श्रीमती बालिका मुळे(पवार)यांची महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी श्री.बाळासाहेब चव्हाण जिल्हाध्यक्ष,शिक्षक काँग्रेस, श्रीमती उषा आडे,उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे,मोसिन बागवान,सौ राजश्री बेडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री.राजेश्वरजी निटूरे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.श्रीशैल्यदादा उटगे, श्रीमती लक्ष्मीताई भोसले, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कल्याण पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटूरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, सुभाष धनुरे, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मंजूरखा पठाण, मागासवर्गीय तालुका सेलचे अध्यक्ष शिवाजीराव देवनाळे, शहराध्यक्ष शशिकांत बनसोडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ता सुरणर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सरोजा बिरादार, शहराध्यक्ष ललिता झिल्ले, श्रीमती.शीलाताई पाटील, सुर्यशिला मोरे, उषा कांबळे, रेखा कानमंदे, बबिता भोसले, प्रेमलता नळगिरे, रमेश पाटील तपशाळकर, रामेश्वर बिरादार जकनाळकर, शेख इब्राहिम देवर्जनकर, माजी समाज कल्याण सभापती मधुकरराव एकुर्केकर, नगरसेवक श्रीरंग कांबळे, राजकुमार भालेराव, फैजूखा पठाण, राजेंद्र भोसले, विलास शिंदे, विक्रांत भोसले, शहर बूथ समन्वयक अहमद सरवर, तालुका बुथ समन्वयक विजयकुमार चवळे, पद्माकर उगीले, दत्ता बामणे, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगीरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर,महेश भंडे, प्रा.गोविंद भालेराव, उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस धनंजय पवार, आदर्श पिंपरे, सद्दाम बागवान, नागेश पटवारी, अविनाश गायकवाड ईश्वर समगे, नंदकुमार पटणे, विपिन जाधव, महेश तोडकर, सुमित सुडे, राहुल पाटील मलकापूरकर, प्रितम गोखले, यशवंत पाटील, जावेद शेख, संस्कार विद्यालयाचे संस्थाध्यक्ष मल्लीकार्जून मानकरी, सचिव काशिनाथ मोंडे, मुख्याध्यापक मंगलकुमार हरकरे, शेषराव कांबळे, मुसने सर, बाबूराव मठपती, अमजदखा पठाण, आशिषसिंग चंदिले, सतीश पाटील मानकीकर, राजेश्वर भाटे, बालाजी पाटील, राजकुमार हुडगे, ज्ञानेश्वर बिरादार, कुणाल बागबंदे इत्यादी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक व राजकीय सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी पुढील काळात शिक्षक काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षणाच्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत न्याय देण्याचे कार्य माझ्या हातून घडेल अशी ग्वाही याप्रसंगी बालिका मुळे यांनी दिली.