सहकार पॅनल च्या वतीने ३४ उमेदवारी अर्ज दाखल
आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १९ जागेसाठी निवडणुक होत असून सहकार पॅनल च्या ३४ उमेदवारांनी सोमवारी सकाळी आकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी आमदार धीरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे , बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेनेचे संतोष सोमवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ही निवडणुक होत असून १९ जागेसाठी हि निवडणुक होत असून ३४ जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आज सोमवार अर्ज भरण्याचा शेव टचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती
आज शेवटच्या दिवशी पर्यंत सहकार पॅनल कडून खालील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत त्यात आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या सहीत ३४ जणांचा समावेश आहे.