समाज हितासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा – डॉ.शरद तेलगाणे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील सर्व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी समजून आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आरोग्य सर्वांसाठी या संकल्पनेनुसार राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत उदगीर डॉक्टर्स असोसिएशन, सामान्य रुग्णालय उदगीर यांच्या वतीने उदगीर शहरातील वेगवेगळ्या 13 खाजगी रुग्णालयात, दवाखान्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसींचा नियमानुसार पहिला व दुसरा डोस मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी पाच वाजेपर्यंत ओम हॉस्पिटल व प्रसूतिगृह नवामोंढा शेतकी निवास जवळ उदगीर येथे लसीकरण संपन्न होणार आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर येथील ख्यातनाम डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे.
नागरिकांनी स्वतःचे आणि समाजाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा. ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी ठराविक कालावधीच्या नंतर दुसरा डोस घेणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी ही सुविधा ओम हाॅस्पिटल प्रसूती व शस्त्रक्रिया गृह मोंढारोड उदगीर येथे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गरजूंनी 98 90 25 82 35 या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून लसीकरणासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करणे शक्य होईल, आणि सर्वांना लस मिळू शकेल. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.