तळेगाव (भो) येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
देवणी ( प्रतिनिधी ) : देवणी तालुक्यातील मौजे तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत तळेगांव (भो) व सरपंच संघटना देवणी यांचे संयुक्त विद्यमानाने दि.26 ऑक्टोबर 2021 रोजी मंगळवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी महेश सुळे हे उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून देवणी पंचायत समीती उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर हे उपस्थित होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य जेष्ठ पत्रकार दत्तात्रय किशनराव पाटील, ग्रामपंचायत तळेगावचे सरपंच तथा देवणी सरपंच संघटना अध्यक्ष सदाशिव रामचंद्रराव पाटील,उपसरपंच सौ.रंजना धनाजी जाधव,ग्रामसेवक गोरे.एस.आर,पोलीस पाटील संभाजी पाटील, प्रदीप निडवंचे, हारी पाटील, अभिजीत पाटील,आदीसह गावकरी उपस्थित होते.
या शिबिरात उदयगिरी लॉयन्स क्लब अध्यक्ष नेत्र तज्ञ डॉ.आर.एन.लखोटीया,श्री.साई हॉस्पिटल उदगीर कान, नाक, घसा,थायरॉईड, स्पेशालिस्ट डॉ.(मेजर) मनोहर सूर्यवंशी, मधुर डायबेटीस सुपरस्पेश्यालिस्टी हॉस्पिटल उदगीरचे मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत नवटके, यानी रूग्णाची तपासणी करून योग्य सल्ला दिला.या शिबिरात 228 रूग्नाची तपासणी करण्यात आली.यावेळी या ठीकाणी कोविड 19 चे लसीकरण ही करण्यात आले यासाठी आरोग्य सेविका बनसोडे डी डी, एम पी,डब्लू, शिंदे एस पी,आशा कार्यकर्ती रंभा सुरवसे, मदतनीस बालीका माचे यानी काम पाहिले.
या कार्यक्रमामध्ये मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी केशव बिरादार,सुदर्शन घंटेवाड यांनी केली, तर कान नाक घसा ची तपासणी करण्यासाठी बालाजी जाधव, सुमित चिल्लरगे, अंजली गिरी यांनी मदत केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सदाशिव पाटील यानी मानले.