वीज भवनला कुलूप लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

वीज भवनला कुलूप लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

नाशिक (रोहित टोम्पे) : ग्रामीण भागातील पथदीप आणि पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ सरपंच परिषद, पंचायत राज विकास मंच यांच्या वतीने मंगळवारी नाशिकरोड येथील विद्युत भवन कार्यालयास टाळे ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलपही सहभागी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. समन्वय साधण्याऐवजी त्यांनी आपल्या सरकार विरोधातील आंदोलन करणाऱ्यांना साथ देऊन काय साधले? यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा होत आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने त्या वीज देयके भरू शकत नाही. यामुळे ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. थकीत देयके न भरल्याने ग्रामस्थांना दिवाबत्ती व पाणीपुरवठा सुविधेपासून वंचित राहावे लागते. याआधी ही देयके जिल्हा परिषद वर्ग करून त्यांच्यामार्फत ‘महावितरण’ला रक्कम दिली जात होती. मात्र त्यात बदल झाला. ग्रामविकास विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही. यामुळे वीज कंपनीने ग्रामपंचायतीच्या थकबाकीची रक्कम ग्राम विकास विभागाकडून घ्यावी, अशी मागणी सरपंच परिषदेकडून करण्यात आली.

ग्रामपंचायतींकडे महावितरणची मोठी थकबाकी आहे. ऐन दीपावलीत पथदीप व पाणीपुरवठ्याशी संबंधित वीजपुरवठा खंडित केला. महावितरणने थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत सांगितले. मात्र ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्याने ते भरू शकत नसल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. हा प्रकार समजताच पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी कुलूप काढून आतमध्ये अडकलेल्यांची सुटका केली. या आंदोलनप्रकरणी आंदोलकांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

‘महावितरण’च्या कार्यालयास विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. या आंदोलनात खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप यांनी सहभागी होऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी आतमध्ये कोंडलेल्या एका अधिकाऱ्याने तुम्ही खासदार आहात, सत्तेत तुमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. असे असताना आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी त्यांना साथ देणे योग्य आहे का? असा प्रश्न केला. त्यावर खासदार गोडसे यांनी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्याला सुनाविले. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यातून खासदार गोडसे, घोलप यांची सुटका झाली. तपासात प्रत्येकाची भूमिका पाहून गुन्हा दाखल होईल, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!