एसटी चे प्रवासी दर शासकीय नियमाप्रमाणे आकारावे – प्रा. आण्णासाहेब मिरगाळे

एसटी चे प्रवासी दर शासकीय नियमाप्रमाणे आकारावे - प्रा. आण्णासाहेब मिरगाळे

निलंगा (भगवान जाधव) : शासकीय नियमानुसार एसटी महामंडळाने पहिला टप्पा म्हणजेच सहा किलोमीटर अंतरावरचा दर दहा रुपये आहे. पण निलंगा आगाराने पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे सहा किलोमीटर अंतरापेक्षा कमी निलंगा नाका ते ननंद हे अंतर फक्त चार किलोमीटर असून त्यासाठी पंधरा रुपये दर आकारला जात आहे. निलंगा नाका ते ननंद हे गाव फक्त चार किलोमीटर आहे .शासकीय नियमानुसार दहा रुपये दर आकारला गेला पाहिजे पण निलंगा आगारा कडून एका टप्प्यासाठी दहा रुपये ऐवजी 15 रुपये दर आकारले जात आहे. यामुळे प्रवाशाचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी निलंगा आगार व्यवस्थापक राठोड यांना याबाबत माहिती दिली व निवेदन दिले. त्यावर निलंगा आगाराचे व्यवस्थापक राठोड यांनी यासंबंधी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दुरुस्ती करून घेतली जाईल असे आश्वासन दिले. निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, गणेश लादे, अभिजीत टोपन्ना इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author