अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा येथे गरजू मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य वाटप

अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा येथे गरजू मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य वाटप

लातूर (प्रतिनिधी) : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर तालुक्यातील शिराळा येथे गरजू मुलांना कपडे , शैक्षणिक साहित्य,खाऊ वाटप तसेच वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक श्री ज्ञानेश्वरदादा काळे यांनी केली. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे लाडके शिवशाहीर संतोष दादा साळुंके यांनी ‘शिवबाची तलवार’ हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध करून आपले मनोगत व्यक्त केले.तसेच तानाजी दादा देशमुख यांनी विकासमहर्षी कै. विलासराव देशमुख साहेब व आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आवाजात अश्विनी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा समन्वयक श्री.राहुल मोहिते-पाटील, कल्याण देशमुख (लातूर जिल्हा प्रवक्ते ) सिताराम काळे (सरपंच) दिलीपराव काळे (चेअरमन) रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सदस्य रायबा लोभे, प्रा.उमाकांत साळुंके, ज्ञानेश्वर विमलचंद काळे, राहुल गव्हाणे, लक्ष्मण आतकरे, खंडू पवार, नितीन शिंदे, स्वप्नील कासगुडे, अनंत कावळे, प्रमोद गायकवाड, बालासाहेब काळे, खय्युम टेलर, विवेक गरड, वाघोली व शिराळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author