भाजप व युवा मोर्चाच्या वतीने एस टी महामंडळाच्या कर्मचार्यानी पुकारलेल्या आंदोलनास जाहिर पाठींबा – पाटोदे

भाजप व युवा मोर्चाच्या वतीने एस टी महामंडळाच्या कर्मचार्यानी पुकारलेल्या आंदोलनास जाहिर पाठींबा - पाटोदे

उदगीर ( प्रतिनिधी ) : संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कर्मचारी यांचा एस टी परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र  शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी आ  या मागणीसाठी आदोलन चालू आहे. आंदोलनास भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने  जाहीर पाठींबा दिल आहे.  निवेदनात महाविकास आघाडी सरकारने एस टी कर्मचार्याचे मागण्या लक्षात घेऊन सरकारने या मागणीचा  तात्काळ निर्णय घेऊन एस टी महामंडळाचे विलगीकरण महाराष्ट्र शासनात करण्यात यावे. 

    त्याच बरोबर या संपात ज्या कर्मचारी आत्महत्या करून जीवन संपविले  आहेत.  अशा कर्मचार्याच्या कुटुंबाला ५० लाखाची  मदत करण्यात यावे.त्यांच्या कुटुबातील पात्रतेनुसार शासकिय सेवेत सामावून घेण्यात यावे. असे निवेदन दिले.अन्यथा  भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चा एस टी  कर्मचार्याच्या बाजूने त्यांच्या आंदोलनात सहभागी  होऊन  एस टी कर्मचारी यांना न्याय मिळेपर्यंत पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.‌यांची शासन दरबारी‌ योग्य ती गंभीर दखल घेण्यात यावी. या प्रसंगी भाजपाच्या वतीने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यास कोणी धमकी दिले, दबाव आणले तर भारतीय जनता पार्टी कर्मचाऱ्यासोबत राहील.असे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी सांगितले.

 याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अमोल निडवदे, किसान मोर्चा अध्यक्ष सुदर्शन माने,अ जा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, तालुका सरचिटणीस माधव टेपाले, दिलीप मजगे, साईनाथ चिमेगावे, जिल्हा चिटणीस गणराज जाधव, नागेश आष्टुरे,गणेश गायकवाड  भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अड दयानंद उदबाळे, राम स्वामी कुसळकर,संतोष भालेराव ईत्यादी जन उपस्थित होते.

About The Author