जागृती शुगर कारखाना ज्यूस टू इथेनॉल निर्मिती करणार – दिलीपराव देशमुख
जागृती शुगर कारखान्याचा १० वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी मांजरा साखर परीवाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक न्याय देण्याची भूमिका देण्याचा प्रयत्न असतो त्यामूळेच आज जिल्ह्यात मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातुन तब्बल १ लाख कुटुंबांना मोठी आर्थिक मदत होते यासाठी शेतकऱ्यांनी चांगला उस दिला तर अधीक योग्य भाव देण्याचा निश्चित प्रयत्न सातत्याने राहिलेला पुढेही राहील जागृती शुगर ज्यूस टू इथेनॉल निर्मिती तयार करणार असुन त्यामूळे अधिक जास्त भाव देण्याचा प्रयत्न राहणार आहे असा विश्वास राज्याचे माजी मंत्री जागृती शुगरचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते शनिवारी देवणी तालुक्यांतील तळेगांव येथील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीज लिमिटेड च्या १o व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार तथा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आमदार धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, प्रदेश सचिव अभय साळुंके, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजू लगे उपाध्यक्ष शाम भोसले, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जागृती शुगर चे संचालक दिलीप माने, प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख उपस्थित होते.
राज्यातील आघाडी सरकारने अतिवृष्टी शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत लातूर जिल्ह्याला केली
राज्यात असलेले आघाडी सरकारने अतिवृष्टी पूर ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवुन लोकांचा विश्वास संपादन केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले निर्णय घेत गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना अधिक न्याय देण्याचे कार्य केले असून कर्ज माफी, अतिवृष्टी, अनुदान देण्यात आले पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात सर्वाधिक अतिवृष्टीचे अनुदान लातूर जिल्ह्याला मिळाले हे आपण ठासून सांगीतले पाहिजे असे सांगून राजकारण म्हणजे लोकांचें प्रश्न सोडवले जावेत योजना राबवून त्याचा लाभ मिळाला पाहिजे हा उद्देश असतो राज्यातील आघाडी सरकारने आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्ज माफी वर केली आहे आर्थिक मदत मिळाली वास्तव्य आहे हे लोक विसरू शकत नाही परंतु विरोधकाना चांगले होत असताना आवडत नाही उठसूठ आरोप करायचे असा टोला विरोधकांना लगावत राजकारण हेतू हा समाज सुखी समाधानी झाला पाहिजे असा हेतू आहे यासाठी समाजाबद्दल जिव्हाळा असणारी व्यक्ती खुर्चीत बसवले पाहिजे ज्या पद्धतीनं लोकशाहीत पेरणी करतात तसे जागृत आपण झाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
भावाने केले भाऊबीज दिवशी बहिणीचे कौतुक
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की आज भाऊबीज आहे माझी दीदी सौ गौरवी देशमुख भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जागृती शुगर साखर कारखान्या च्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमास मी आहे मी भाग्यवान आहे असे सांगून गौरवि दीदी सासर– माहेर चांगल चालवण्या बरोबर जागृती शुगर कारखान्याची वाटचाल दैदिप्यमान आहे खूपच आनंद वाटतो आहे असे सांगून जागृती शुगर ने कमी खर्चात उभारणी, सर्वधिक नफा, विक्रमी शेतकऱ्यांना भाव तीन सुत्री कार्यक्रम आखत चांगला कारखाना आवलस्थानी स्थानी ठेवून मांजरा परिवारातील खाजगी कारखाना नावारूपाला आणला त्यात काकाचे मोठे योगदान मार्गदर्शन लाभले आहे भविष्यात या परिवारात नविन टेक्नॉलॉजी च्या के एन टू के माध्यमातुन इथे इथेनॉल इंधन निर्मिती होणारं असून भविष्य सुवर्ण काळ राहील असा विश्वास आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला
आम्ही कोटी रूपये देतो, खोटी माहीत देणारे विरोधक
राज्यातील आघाडी सरकारने अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केली आमचे राज्यातील सरकार, लातूरचे पालकमंत्री ना अमित देशमुख यांनी पाठपुरावा केल्याने दिवाळीपूर्वी मदत झाली मराठवाड्यात सर्वाधिक मदत लातूर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाना झाली हे आपल्या मुळे झाली हे ठासून सांगितले पाहिजे असं असताना विरोधक म्हणतात त्यांच्यामुळे झाले हे साफ खोटं आहे आम्हीं शेतकऱ्यांना उस उत्पादक माध्यमातून कोट्यवधी रुपये देतोय तर विरोधक खोटी माहिती देणारे मंडळी आहे असा टोला विरोधकांना लगावला.
यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख यांनी केले याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रमोद जाधव, संभाजी सुळ, भगवानराव पाटील विजयन गरकर, गोविंद भोपनीकर, मारूती पांडे, दिलीप पाटील नागराळकर, हारीराम कुलकर्णी, सचिन दाताळ,जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक तानाजी जाधव, डॉ अरविंद भातांब्रे, निलंगा युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गजानन भोपनिकर, वैजनाथ लुल्ले, राम भंडारे, बोबडे, मानकरी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ, तसेच कर्नाटक राज्यातील सभासद यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळावर जावून मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनू डगवाले, तर आभार प्रदर्शन प्रा. भगवान गायकवाड यांनी मांडले.