सहकार पॅनल च्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार

सहकार पॅनल च्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार

कोविड काळात निराधार लोकांना घरपोच सेवा देवुन जिल्हा बँकेने आधार दिला

लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँक ही महत्त्वाची संस्था असुन मागील संचालक मंडळाने घेतलेले चांगले निर्णय पुढे घेऊन जाण्याचे, त्याचे अनुकरण करण्याचे काम नुतन संचालक मंडळाच्या माध्यमातून केले जाणार आहे दिलीपराव देशमुख साहेबांनी सर्व सामान्यांना, शेतक-यांना, गरजू निराधारांना दिलेला मदतीचा शब्द कधीही खोटा ठरु दिला नाही. याची छोटे, मोठे अनेक उदाहरणे देता येतील असे सांगून आमदार धीरज देशमुख यांनी अलिकडे त्यांनी संत शिरोमणी मारोती महाराज कारखाना स्वत:च्या पायावर उभा करुन अनेकांच्या प्रपंचाला हातभार लावला आहे लोकहिताच्या महाविकास आघाडी सरकारने पूर व अतिवृष्टीची मदत तातडीने बँकांकडे वर्ग केली. मदत सर्व नुकसान ग्रस्तांपर्यंत वेळेत पोहचविण्याचे काम जिल्हा बँकेच्या सर्व शाखांनी केले. वैद्यकीय सेवा जसा तातडीने दिल्या जातात, तशीच तत्परता जिल्हा बँकेने दाखवून शेतक-यांना दिलासा देण्याचे काम केले अशा त्यामुळेच जिल्ह्याचा आर्थिक भौतिक विकास झाला आहे या सहकार पॅनल च्या माध्यमातुन आगामी काळात लोकहिताचे विकासाचे काम करणार आहे त्यासाठी सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी आशिर्वाद द्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले. ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक २०२१ लातूर तालुक्यातील मळवटी येथे मंगळवारी सायंकाळी प्रचार सभेत बोलत होते.

निराधारांना कोविड काळात घरपोच सेवा देणारी राज्यातील लातूर जिल्हा बँक

पुढे बोलताना धीरज देशमुख म्हणाले की, कोविड काळात निराधार कुटुंबांना घरपोच सेवा देऊन माणुसकी जपण्याचे काम बँकेने केले आहे. लोकांच्या गरजेला मदत करणे, अडीअडचणीत धावून जाण्याचे काम जिल्हा बँक नियमांच्या अधीन राहून करीत आलेली आहे. जिल्हा बँकेमुळे जिल्ह्यातील २५ वर्षात समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था झपाट्याने बदलली आहे. हे काम दृष्टा नेतृत्वाने केले आहे. सहकार विचाराची लढाई लढत, सर्वांना सोबत घेऊन हे लोकहिताचे, विकासाचे काम आगामी काळात अधिक गतिमान करायचे आहे यासाठी येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या सर्व सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

दिलीपराव देशमुख साहेब यांनी लोकांची चूल पेटवायचे काम केले – अशोक गोविंदपूरकर यांचे मत

यावेळी बोलताना उमेदवार अशोक गोविंदपूरकर यांनी विरोधी पॅनल च्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत आमचे नेते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी मागच्या ३० वर्षात जिल्हा बँकेच्या व साखर कारखान्याच्या माध्यमातुन सर्वसामान्य लोकांची चूल पेटविण्याचे काम केले हे डोळ्यासमोर दिसत आहे मात्र विरोधक सगळीकडे फिरत चुलीत पाणी ओतायचे काम करीत आहेत यापासून आपण सावध राहिले पाहिजे आशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे या निवडणूकीत सहकार पॅनल उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपिठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, कृषि उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती मनोज पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हारिराम कुलकर्णी सहकार पॅनल चे उमेदवार सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, तालुक्यातील मतदार उपस्थित होते.

About The Author