बालाघाट परिवाराकडून अमरदीप हाके यांचा सत्कार संपन्न
अहमदपूर( गोविंद काळे ) : बालाघाट तंत्रनिकेतन व आयटीआयचे , रुद्धा ता अहमदपूर चे संचालक अमरदीप गणेश हाके यांची नुकतीच उत्तर मुंबई भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बालाघाट तंत्रनिकेतन च्या वतीने प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना समाजसेवेचे बाळकडू माझे वडील गणेश हाके यांच्या कडूनच मिळाले आणि पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड असताना त्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी ने माझ्या कार्याची दखल घेऊन मला चांगले काम करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे या माध्यमातून मी आणखी चांगल्या प्रकारे समाज सेवा करेल असा विश्वास अमरदीप हाके यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी अमरदीप हाके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य डॉ नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, आयटीआयचे प्राचार्य मदन आरदवाड, कालिदास पिटाळे, सुहास दहीटनकर, महेश स्वामी, आरती पुणे, सचिन आडे, समीर कुरेशी, तोहीद शेख, रूपा पाटील, श्रुती मेनकुदळे, गणेश यमगीर, संतोष लातूरे, भिसे अभिमन्यू, मोरे मयुरी,सूर्यवंशी, कुलकर्णी विजय, विजय पांचाळ, मंगेश चव्हाण, सिद्राम मासोळे, सतीश केंद्रे आदी कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.नितीन शिवपुजे तर सूत्रसंचालन सिद्धू मासुळे व आभार संतोष लातुरे यांनी मानले.