निराधार लाभार्थ्यांना घरपोच सेवा देण्याचा पॅटर्न अनुकरणीय – डॉ.जितेंद्र देहाडे
मुशिराबाद येथे संगायो समिती तालुका लातूर ग्रामीणची ३८ वी जनजागृती व सुसंवाद बैठक संपन्न
लातूर (प्रतिनीधी) : लातूर तालुक्यातील मौजे मुशिराबाद येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ३८ वी संजय गांधी निराधार योजना जनजागृती व सुसंवाद बैठक घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ,विधवा व दिव्यांग योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुशिराबाद सोसायटीचे चेअरमन गोविंद मलवाडे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व लातूरचे शहर काँग्रेस चे प्रभारी डाॅ.जितेंद्र देहाडे, संगायोचे लातूर ग्रामीण चे चेअरमन प्रविण पाटील, लातूर कृ.ऊ.बा.समीतीचे उपाध्यक्ष मनोज पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे सहसचिव हरिभाऊ गोणे, संगायोचे सदस्य हरीश बोळंगे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रविण बिरादार, ज्ञानोबा गवळे, सचिन दाताळ, अच्युत माने व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डाॅ.जितेंद्र देहाडे यांनी आपल्या भाषणातून स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणीना उजाळा दिला . लातूरचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांचे कार्य जनतेपुढे मांडून आमदार धिरज देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी संगायो समिती लातूर ग्रामीण च्या वतीने आदर्शवत काम सुरू असून घरपोच अर्ज वितरण, जनजागृती व सुसंवाद बैठक, समाधान शिबीर व घरपोच मंजुरी पत्र वितरण या चतुसुत्रीच्या माध्यमातून काम करत असुन लाभार्थ्यांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राज्यभर पथदर्शी ठरेल असे सांगून संगायो समिती लातूर ग्रामीण च्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रविण पाटील यांनी निराधारांच्या विविध योजनेची सविस्तर माहीत देऊन उपस्थितांशी विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे समाधान केले व घरपोच अर्ज वितरणापासुन ते घरपोच मंजूर पत्र वितरण करण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगून मुशिराबाद येथील पात्र लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वितरण करण्यात आले.
या वेळी सरपंच प्रशांत मलवाडे, उपसरपंच बालाजी मनदुमले, सोसायटीचे व्हाइस चेअरमन देवानंद पल्ले,ह.भ.प.महादेव महाराज पल्ले, महेबुब पठाण,हबीबसाब पठाण,विपीन गवरे,बालाजी वाघमारे, राहुल गरड, ज्ञानोबा पडीले,ऋषीकेश सगर,परमेश्वर समदर्गे यांच्यासह गावातील निराधार व नागरिक आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी योजना सदस्य हरीश बोळंगे यांनी केले तर सूत्रसंचालन लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस कमलाकर अनंतवाड व आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे सहसचिव हरीभाऊ गोणे यांनी केले.