मारुती महाराज साखर कारखान्याची उत्पादन झालेली साखर बाहेर पडली

मारुती महाराज साखर कारखान्याची उत्पादन झालेली साखर बाहेर पडली

तालुक्यात उस उत्पादक यांच्यात आनंदाचे वातावरण

लातूर (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज साखर कारखान्याने यावर्षी गळीत हंगामात उत्पादन केलेली साखर आज मंगळवारी बाहेर पडली त्यामूळे औसा तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून मांजरा परिवाराने दिलेल्या शब्दाची पूर्ती झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे गेली ७ वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना यावर्षी सुरु झाला आणि तात्काळ साखरेचे उत्पादन सुरू झाले झाल्याने परिसरातून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. तिन दिवसापूर्वीच २७ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री ना. अमित देशमुख , आमदार धीरज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते मोळी टाकुन शुभारंभ केला होता त्यानुसार २८ तारखेला प्रत्यक्ष गाळप सुरू झाले पहील्या दिवशी ७७० मेट्रिक टन क्रेशिंग झाले तर दुसऱ्या दिवशी ९०० मेट्रिक टन गाळप झाले आहे अवघ्या तीन दिवसापूर्वी चिमणी पेटली आज मंगळवारी उत्पादन केलेली साखर बाहेर पडली आहे पहील्या पोत्याचे पूजन संत मारुती महाराज यांच्या मूर्ती समोर ठेवून नारळ फोडण्यात आले महाराजांचे आशिर्वाद घेतले.

राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख, पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हॉईस चेअरमन शाम भोसले, सन्माननीय संचालक मंडळ यांच्या सूचनेनुसार संत मारुती महाराज साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात आला असून कारखाना परिसरात अंदाजे एकूण पाच लाख मेट्रिक टन ऊस असून त्यापैकी सभासदांचा अंदाजित तिन लाख मेट्रिक टन ऊस उस आहे तर बिगर सभासदांचा दोन लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असुन कारखाना अंदाजित तिन लाख टन उस गाळप करणार असल्याची माहिती मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळ गे, व्हाइस चेअरमन शाम भोसले, सरव्यवस्थापक दत्ता शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, प्रदीप चव्हान, सुरेश पवार, चीफ इंजिनिअर पवार, चीफ केमिस्ट बालकुंदे, चीफ अकाँटंट चव्हान, शेतकी अधिकारी शिंदे, अधिक्षक सावंत, उस पुरवठा अधिकारी घोंगडे आदी उपस्थित होते.

About The Author