जयभिम चित्रपटासाठी आंबेडकर पार्क वर जमला अथांग जनसागर!
लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभर गाजत असलेला ‘ जयभिम ‘ चित्रपट पाहण्याची संधी लातूरकराना मिळावी यासाठी डॅा.बाबांसाहेब आंबेडकर जंयती महोत्सव समिती २०२१ ने डिजीटल स्क्रीन वर हा चित्रपट दाखवला. याचा शुभारंभ भन्ते पय्यानंद व उमरगा येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती नागोराव आबाजी भालेराव यांच्या शुभहस्ते झाला. प्रस्तुत ‘ जयभिम ‘ चित्रपट प्रदर्शित करण्यास नागोराव आबाजी भालेराव यांनी आपल्या पेन्शन मधुन रु.पंचवीस हजार धम्मदान केले. नागोराव भालेराव हे निखील शिवाजी गायकवाड यांचे आजोबा प्राचार्य डॅा. शिवाजी गायकवाड,पुणे येथील सेवानिवृत्त आरोग्य सेवा सहसंचालक डॅा. बी. पी. गायकवाड यांचे ते सासरे आहेत. ९ डिंसेबर १९५६ रोजी सालेगाव ता. उमरगा येथे त्यांनी बाबासाहेबाच्या अस्थीं आणल्या तेव्हापासुन १४ एप्रिल व ६ डिंसेबर साजरा केला जातो. त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बौध्द विहारासाठी ५ कोटी ९२ हजार रूपये मंजूर केले आहेत. सध्या बौध्दविहारांचे काम सुरू आहे. लवकरच पहिला स्लॅप पडेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षस्थानी निखील गायकवाड व सर्व डॉ. पदाधिकारी यांनी महात्मा फुले व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरूवात आझादी का अमत महोत्सव निमित्ताने राष्ट्रगीताने झाली. भन्ते पय्यानंद यांनीअतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल जंयती उत्सव मंडळांचे कौतुक केले. याप्रसंगी नागोराव भालेराव यांनी आपल्या महत्त्वपूर्ण आठवणी सांगितल्या. डॉ. बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता आले नाही परंतु सालेगाव तालुका उमरगा येथील लोकांनी त्यावेळी वर्गणी करून महापरिनिर्वाण दिनी मुंबई येथे पाठवले व ९ डिंसेबर १९५६ रोजी वाजत गाजत अस्थिकलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज मितीस वय वर्ष ९१ असलेल्या नागोराव भालेराव यांच्यामुळे १५ कोटी रूपये आज सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी देवून गावाचे शुशोभीकरण व बौध्द विहार यांचे काम चालु आहे. त्याचा पहिला हप्ता मिळाला असून काम प्रगतीपथावर आहे. या कार्यक्रमाची कल्पना प्रा. विजय अंनत लांडगे याची, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी रवीकुमार कांबळे यांनी स्क्रीन स्पाॅन्सर केली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले. प्रा.अनंत लांडगे, बालाजी सूळ, केदार कोथींबीरे, साधु कांबळे,अशोक कांबळे,संजय ओव्हाळ, अर्चना आल्टे, ब्लु पॅन्थर संघटनेचे साधू गायकवाड, प्रवीण कांबळे, राजू गवळी, महेश गुंड, बालाजी सूळ, विनय हनुमंत जाकते, अक्षय धावारे,बंटी गायकवाड,चिंटू गायकवाड, बाबा कांबळे, दत्ताभाऊ कांबळे, सुनील मस्के, सुरज ढगे, निलेश मांदळे, बाबा ढगे, क्षितिज कांबळे, समीर लातूरकर, सुनील घोडके, ऋषी जाधव, समाधान घोडके या सर्वांच्या परिश्रमातून अथांग जनसागराच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.