दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मौजे.सुगाव ता.चाकूर येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीपराव देशमुख (मालक) यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन समारंभ संपन्न झाला.१)मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी कंपाऊंड वॉलचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
२)मातंग समाजाच्या समशानभूमी कंपाउंड वॉल चे व शेडचे भुमीपुजन करण्यात आले.
३) सुंगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या दोन वर्ग खोलीचा भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी जि.प सदस्य सौ.धनश्री राजेश अर्जुने, सरपंच विष्णू कातपूरे, ग्रामसेवक शृंगारे साहेब, शालेय समिती अध्यक्ष विजयपाल गायकवाड, ग्रा.प सदस्य कैलास कंधारे, मुख्याध्यापक माचपल्ले सर,राजेश अर्जूने, भाजपा जेष्ठ नेते सुर्यकांत चव्हाण, बाळासाहेब पांडे, केशव वाघमारे, मोहन बुदरे, बाळू पांचाळ, जगन्नाथ टोमपे, गणेश कोंडेकर,बालाजी सावंत,मारोती कांबळे शेख जेलिनी उस्मान,शेख रजाबखान गावातील नागरिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!