भारतीय संविधानात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुडाची भावना येवू दिली नाही – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

भारतीय संविधानात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुडाची भावना येवू दिली नाही - डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : सबंध भारतीयांसाठी भारतीय संविधान हाच पवित्र धर्मग्रंथ मानून यास समाजमान्यता द्यावी असे आग्रही प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
सम्राट मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत संविधान गौरव दिन व संविधानाच्या उद्देशीकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागरबाई जाभाडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,रिपाई राज्य सचिव बाबासाहेब कांबळे,दत्तोबा कांबळे, डाॅ.फूजैल जागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलताना युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,व्यवस्थेच्या विषमतेचे चटके,अपमान सहन करून बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये कधी सुडाची भावना येवू दिली नाही.अपमानाचे विष पचवून सबंध भारतीय समाजाला संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता,न्याय,बंधूतेचे अमृत दिले असून सबंध भारतीयांवर त्यांनी उपकार केले आहेत असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व संविधानाच्या उद्देशीकेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्या नंतर उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या प्रसंगी रिपाई राज्यसचिव बाबासाहेब कांबळे,पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर यांनी केले तर आभार पंचायत समितीचे कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे यांनी मानले.

कार्यक्रमास दयानंद वाघमारे,मेघराज गायकवाड,अशोक सोनकांबळे,एम.एन.क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मतीन शेख,राहूल गायकवाड,शेखुभाई शेख,शेख मौलाभाई, भाऊसाहेब कांबळे,सचिन बानाटे,राहूल गायकवाड, पत्रकार गणेश मदने,संगमेश्वर बनसोडे,प्रा.गोन्टें सर,पत्रकार त्रिशरण वाघमारे,भिमराव कांबळे, कैलास भालेराव, संभाजी कांबळे,अजय भालेराव आदींनी पुढाकार घेतला.

About The Author