नांदगाव येथे दिव्यांग बालकांचा सन्मान

नांदगाव येथे दिव्यांग बालकांचा सन्मान

लातूर (प्रतिनिधी) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ०३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव ता. लातूर येथील दिव्यांग विद्यार्थी ओमकार उदाहरे यांचा सन्मान पुष्पहार घालून व गुलाबपुष्प देवून शाळेतील उपक्रमशिल शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख यांनी केला.

यावेळी सुनिता पवार, सानिया शेख, संगीता उदारे, गोपाळ मुळे आदींसह शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दिव्यांग ओमकारला आनंदी जीवन जगण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये निबंध, भाषण, चित्रकला, रांगोळी आदी प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता.

About The Author

error: Content is protected !!