सचिन घोळवे यांना पीएचडी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील रहिवासी असलेले सचिन भागवतराव घोळवे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. उदगीर येथील रहिवासी आणि लातूर येथील चन्नाबसवेश्वर औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डाॅॅ. सचिन भागवतराव घोळवे यांनी आयडेंटिफिकेशन अँड कॅरेक्टराययजेशन ऑफ इंप्युरिटीज इन फार्मासिटिकल ड्रग्स सबस्टेंन्सेस या विषयात संशोधनाचा प्रबंध सादर करून औरंगाबादेतील येथील वाय बी चव्हाण कॉलेज अॉफ फार्मसी चे विभाग प्रमुख डॉक्टर जयप्रकाश संगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात सादर केला. सदर प्रबंधास मान्यता देऊन सचिन घोळवे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. यापूर्वीही सचिन घोळवे यांना तीन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध व दोन आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

About The Author