मित्रानेच केला मित्राचा खुन आणि झाला स्वता: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर

मित्रानेच केला मित्राचा खुन आणि झाला स्वता: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर

पुणे ((रफिक शेख) : चेष्ठा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातुन तरुणावर चाकुने वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मित्राचा चाकुन वार करून स्वता : फरासखाना पोलीस ठाण्यात हजर झाला.अमन अशोक यादव ( वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे आर सी एम गुजराती शाळे जवळ हा प्रकार घडला असुन सकाळी उघडीस आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पाटिल व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात दोन.तीन दिवसापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती त्याचा राग पाटील याच्या मनात होता.आज सकाळी आर .सी एम गुजराती शाळेजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला त्यावेळी पाटिल याने अमन यादव याच्यावर चाकुने वार करून त्याचा खुन केला त्या नंतर त्याची माहिती त्यानेच स्वता: पोलीस चौकीत येऊन दिली. या प्रकाराने पोलीसानमध्ये ही खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तेथे एक मृत देह पडलेला आढळुन आला. मृतदेह ससुन रूग्णालयात पाठवण्यात आला असुन वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना झाले आहेत. आरोपी ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

About The Author

error: Content is protected !!