७० हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलीस उपनिरिक्षक एसबीच्या जाळ्यात तर फोजदार फरार

७० हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलीस उपनिरिक्षक एसबीच्या जाळ्यात तर फोजदार फरार

पुणे (रफिक शेख) : पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पिंपरी.चिंचवड आपुक्तालयाच्या हदीत लाच प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकल्या आहेत. तर एक सहाय्यक फौजदार फरार झाला आहे. एसी बीच्या कारवाई मुळे पिंपरी. चिंचवड पोलीस आयुक्ताल यात प्रचंड खळबळ उडाली आहे.सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरातच ट्रॅप यशस्वी झाल्यान पोलीस दलात चर्चा रंगली आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक हेमा सोळंके असे महिला पोलीसाचे नाव आहे तर सहाय्यक फौजदार अशोक देसाईं हे फरार झाल्याचे समजत आहे. उपाधीक्षक श्रीहरी पाटील यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती दरम्यान तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये महिला उपनिरिक्षक हेमा सोळंके आणि सहाय्यक फौजदार अशोक देसाई हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

About The Author