पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे (रफिक शेख) : वाहतूक पोलीसाला अरेरावी करून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून खुर्च्या फेकल्या प्रकरणी एका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश नरुटे, पोलीस अमलदार भारती विद्यापीठ वाहतूक विभाग, पुणे यांनी फिर्याद दिली आहे. हर्षल बापूराव रोहिले, वय-21रा.लेन नं 3 शरदनगर चिखली याला अटक करण्यात आली आहे.काल कात्रज चौकात कोंढवा बाजुला जाणारे रोडचे जंक्शनला त्यानंतर कात्रज पोलीस चौकी येथे हर्षल रोहिले हा चारचाकी गाड़ी भरधाव वेगाने धोकादायकरित्या चालवुन, सतत हॉर्न वाजवत असताना फिर्यादी नरुटे हे वाहतूक शाखाच्या वर्दीवर त्यांचे कर्तव्य बजावून वाहतुकीचे नियमन करीत असताना , त्यांनी रोहिले यांची गाड़ी थांबवली, परंतु त्याने गाड़ी न थांबता पुढे जावून, इतर वाहतूक विभागाचे कर्मचारी यांचेशी हुज्जत घालून, गाडीचे लायसन्स व कागदपत्रे दखावण्यास नकार देवून, तुम्हाला माझ्यावर करवाई करण्याचा अधिकार नाही मी तुम्हाला बघुन घेइन,तुझी नोकरी घालवतो,तू मला ओळखत नाही असे म्हणून फिर्यादी व त्याचे सहकारी यांचे अंगावर धावून गेला. फिर्यादी यांनी त्यास कात्रज पोलीस चौकी येथे आणल्यावर त्याने चौकीतील खुर्च्या व इतर साहित्य फेकाफेकि करुन नुकसान करून, चौकीतील पोलीस अधिकारी यांचेबरोबर झटापटी करून त्यांना अपशब्द वापरून, ते करीत असलेल्या सरकारी कामत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author