जळकोट शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये मंजुर – ना राज्यमंत्री संजय बनसोडे
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या नागरी सुविधा योजने अंतर्गत राज्यशासनाने जळकोट शहरातील विविध पुतळ्याच्या पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजुरी दिली. यामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरु महात्मा बसवेश्वर महाराज व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे भव्य दिव्य असे पुतळा उभारण्यात येणार आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे तसेच यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे
अनेक वर्षे पासून नागरिकांच्या आरोग्याचा असो अथवा मूलभूत सुविधेच्या विकासाचा यावर प्रामुख्याने भर देत जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे दृढ निश्चय राज्यमंत्री संजय जी बनसोडे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे यासोबतच शहरात दलित वस्ती, मुलभूत योजनेचे कामे प्रगती पथावर सुरू आहेत याचा लवकरच फायदा येथील नागरिकांना होणार असुन त्यामध्ये अजून एक भर देत राज्य शासनाने शहरातील महापुरुषांच्या पुतळयासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे यात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासाठी 50 लाख, जगतगुरु महात्मा बसवेश्वर महाराज पुतळयासाठी 25 लाख, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयासाठी 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यातून शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे या महापुरुषाचे विचार सतत समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतात यांचे विचार प्ररेणा व उर्जा देत असतात अशा महापुरुषाचे पुतळे उभा करण्यात येणार आहेत यातून शहराच्या सौदयात भर पडणार आहे या महापुरुषांच्या पुतळ्याची उभारणी व सुशोभिकरण त्वरित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.