अहमदपूरात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
अहमदपूर ( गोविंद काळे ) : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन (२८ नोव्हेंबर) व संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त येथील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यासमोर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके तर उदघाटन
शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त गणपतराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंनिसचे राज्य सरचिटणीस हरीदास तम्मेवार, प्रतिक जाधव,डॉ.सतीश पेड, प्रा.दत्ता गलाले,डाॅ.प्रविण भोसले, जीवन नवटक्के,जगदीश जाधव,ज्ञानोबा भोसले,डाॅ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, ग्यानोबा घोसे, प्रा.दिलीप भालेराव, नरसिंग सांगवीकर,राजकुमार गोंटे,प्रशांत जाभाडे, मुकुंद वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.गणपतराव माने,प्रा गोविंदराव शेळके आदींनी मनोगत व्यक्त केली.यावेळी ६१ रक्त बाटलीचे संकलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोकराव चापटे यांनी तर सुत्रसंचालन प्रा.पुरूषोत्तम माने यांनी तर आभार संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा.नाना कदम यांनी मानले.रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी समर्थ लोहकरे, बालाजी उच्चेकर,संतोष कदम, गणपतराव जाधव, प्रा.संतोष पाटील, बालाजी वाडीकर,ॲड.आनंद जाधव,सचिन जगताप, राम सुर्यवंशी, शिध्दार्थ दापके, शिवशंकर लांडगे,दशरथ जाधव, पांडूरंग तोरणे, रोहीदास पवार, वामन सांगुळे,ज्योतिर्लिंग शिंदे,श्रीधर तराटे आदींनी परीश्रम घेतले.