सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेवून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा: ना संजय बनसोडे
जळकोट (प्रतिनिधी) : सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून त्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. जळकोट तालुक्यात शहर व ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत यामुळे हा तालुका गेली अनेक वर्षे विकासा पासून वंचित आहे , मागे काय झालं ते न पाहता यापुढे आपण सर्वांनी मिळून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा व स्वच्छता पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांनी जळकोट येथे आयोजित कर्यार्त्याच्या बैठकीत केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , हे सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करते , आजही सर्वसामान्य लोकांच्या अनेक समस्या आहेत , प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील लोकांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील तालुका अध्यक्ष श्री आगलावे मामा, विठ्ठल चव्हाण, रामराम राठोड ,गजानन पाटील इत्यादी उपस्थित होते.