अहमदपूर च्या जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

अहमदपूर च्या जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने अहमदपूर येथील जिल्हा न्यायालयात संविधान दिन नुकताच संपन्न झाला. येथील न्यायालयाच्या प्रांगणात कोवीड रोगाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करुन संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश संभाजी ठाकरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.भुषणकुमार जोरगुलवार हे उपस्थित होते. कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी कायद्याचे पालन करुन समाजात समता व समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे अहवान संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायाधीश संभाजी ठाकरे यांनी केले. संविधान दिन हा आपल्यासाठी गौरवशाली दिवस असुन संविधान तयार करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा असल्याचेही यावेळी प्रा. डॉ.भुषणकुमार जोरगुलवार यांनी सांगितले. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन तन्मय ठाकरे यांनी केले.

यावेळी न्यायाधिश प्र.अ.सवदिकर, न्यायाधीश एस.जी.साबळे, न्यायाधीश एस.एस.तोंडचिरे, सह दिवानी न्या.उत्पात ए.ए., तहसीलदार प्रसाद कुलकर्णी,सरकारी वकील एम.के.पाटील , तालुका वकील संघाचे अध्यक्ष एच.आर.पाटील , उपाध्यक्ष एम.बी.डख, वकील संघाचे सचिव एस.एस.दराडे,एस.डी.कराड,अॅड.ठाकरे मॅडम,अॅड.रोहीणी देशमुख, जेष्ठ विधीज्ञ अॅड.भगवानराव पौळ,अॅड.वसंतराव फड, भारतभूषण क्षीरसागर,डी.एल.घोगरे,बी.व्ही जगताप,आर.एस.वाघमारे,व्ही.एस.सोनकांबळे,एस.एस.कांबळे,पी.ए.कांबळे, तालुका विधी सेवा समितीचे विकास कराड यांच्या सह वकील संघाचे सर्व सदस्य, पक्षकार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.टी.एन कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन एम.एस.कांबळे यांनी तर आभार सहदिवानी न्यायाधिश ए.ए.उत्पाद यांनी मानले.

About The Author