लोकशाही एक्सप्रेसच्या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी शिवसेनेच्या सचिन दाने यांची निवड

लोकशाही एक्सप्रेसच्या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी शिवसेनेच्या सचिन दाने यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : इंडियन स्कूल ऑफ डेमॉक्रसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही एक्सप्रेस या राष्ट्रीय राजकीय कार्यशाळेसाठी देशातील ५० युवा नेत्यांमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांची निवड झाली आहे.या अंतर्गत ४ राज्यांमध्ये १० दिवसांचा अभ्यास दौरा होणार असून त्या-त्या राज्यातील प्रभावी नेते मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार दि.३ डिसेंबर रोजी या अभ्यास दौऱ्यास प्रारंभ झाला आहे.या कालावधीत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या ४ राज्यातून, १ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास होणार आहे. या काळात लोकसत्ता चळवळीचे चे डॉ.जे.पी.नारायण, माजी शिक्षणमंत्री पंडियाराजन,माजी आमदार बालभारती,कर्नाटकात आ.प्रियांक खर्गे,लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शालीन मारिया,निवृत्त प्रशासकीय अधिकारी शशिकांत सेंथिल,चित्रपट निर्माता आर कन्नन,उद्योग मंत्री कलवकुंतला आणि आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे.तरुणांमध्ये असणारा सकारात्मक विचार अधिक प्रगल्भ व्हावा, लोकशाहीची संकल्पना दृढ व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरोगामी व मान्यवर व्यक्तींच्या भेटीत राजकारणातील सर्व स्तरातील नायक, राजकारणातील आव्हाने, वास्तवातील परिस्थिती याचा अभ्यास करता येणार आहे. विविध राज्यात राजकारणात सहभागी होणारे नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा होणार आहे.निवडणुकीचे राजकारण तसेच त्यात असणारा वकील,विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग याचाही अभ्यास यात होऊ शकणार आहे.
या महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author