नागरिकांनी लस घेतल्याशिवाय प्रवास करू नये वाहतूक शाखा व टॅक्सी संघटना कडून जनजागृती
लातूर (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लस हाच एकमेव पर्याय असल्याने प्रत्येक नागरिकांनी लस घेऊन देशहितास सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला यांनी केले, टॅक्सी संघटनेच्या वतीने वाहतूक पॉईंटवर कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व या संदर्भात जनजागृती व्हावे यासाठी आयोजित उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मागील ४०दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांचा ओढा खाजगी वाहनांकडे आहे, खाजगी वाहनांतून मोठ्या प्रमाणावर होत असलेली रहदारी सुरक्षित असावी, संपूर्ण नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी शासनाकडून सद्या विविध मोहीम हाती घेण्यात येत आहेत, याला प्रतिसाद म्हणून राजीव गांधी टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष अण्णा कांबळे व वाहतूक शाखेच्या वतीने हा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रवाशांना लसीचे महत्व तसेच कोरोना वर मात करण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता याबाबत सविस्तर माहिती दिली,सर्वांनी लस घ्यावी यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी, चालक वाहक आणि प्रवासी उपस्थित होते.