महात्मा फुले महाविद्यालयास अंतर महाविद्यालयीन तलवारबाजीत आठ कांस्यपदक

महात्मा फुले महाविद्यालयास अंतर महाविद्यालयीन तलवारबाजीत आठ कांस्यपदक

अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘ब’ झोन मध्ये तलवारबाजी या क्रीडा प्रकारात आठ ब्राँझपदक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि.३ नोव्हेंबर २०२१रोजी शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झालेल्या तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत लातूर जिल्हा ‘ब’ झोन मध्ये सेबर प्रकारात आठ ब्रांझ मेडल प्राप्त केले असून या क्रीडास्पर्धेत कु. गीता दोडे फॉईल मध्ये ब्राँझ , कु. ऐश्वर्या रेचवाड फॉईल मध्ये ब्राँझ, कु.निशा ससाणे इप्पी मध्ये ब्राँझ, कु. मनिषा सुरनर सेबर मध्ये ब्राँझ, कु. कांचन गुट्टे सेबरमध्ये ब्राँझ, शेख अल्ताफ इप्पीमध्ये ब्राँझ तर यशपाल बनसोडे ने फॉईल व इप्पी तलवारबाजी प्रकारात ब्राँझ पदक प्राप्त करून क्रीडा क्षेत्रात फुले महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला आहे. या खेळाडूनां क्रीडा संचालक प्रो. डॉ.अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व यशस्वी खेळाडूंचा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी , कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author