फुले महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उल्लेखनीय – मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले महाविद्यालयाने ग्रामीण भागातून जिल्ह्यातच नव्हे तर विद्यापीठ स्तरावर गुणवत्तेचा दर्जा उंचावणारे वाढवणारे अध्यापन कार्य करून अहमदपूरच्या लौकिकात भर टाकून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उल्लेखनीय असल्याचे सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांचा ४नोव्हें. रोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी व महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात आमदार ते राज्यमंत्री हा जीवन प्रवास उलगडून दाखवला. रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आलेले अनुभवही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच महात्मा फुले महाविद्यालयाने अल्पावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील आणि सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी पत्रकार अहमद तांबोळी यांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मा. बाळासाहेब जाधव यांनी आपल्या कार्याने उदगीर, अहमदपूर परिसराचा कायापालट केला आहे , त्यांना या भागाचे भाग्यविधाते म्हटले जाते. या लोकनेत्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले, हा खऱ्या अर्थाने विद्यापीठाचाच सन्मान आहे असेही म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर व्यक्त केले.