अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा ‘स्वारातीमवि’ च्या पदवी परीक्षेत गुणवत्तेचा ‘दबदबा’ कायम
हिंदीत २ रोख तर इंग्रजीत १ रोख पारितोषिक आणि राज्यशास्त्र विषयात २ विद्यार्थ्यांना ४ सुवर्णपदक प्राप्त
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२० परीक्षेत हिंदी, इंग्रजी व राज्यशास्त्र विषयात प्रथम येऊन तीन रोख पारितोषिकांसह चार सुवर्ण पदक प्राप्त करून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले महाविद्यालयाची गुणवत्तेची अखंड परंपरा कायम ठेवत उच्च शिक्षणातला ‘ फुले पॅटर्न ‘ चा विद्यापीठात ‘दबदबा’ कायम ठेवला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. ज्ञानेश्वरी व्यंकट श्रीरामे हिने हिंदी ऐच्छिक विषयात विद्यापीठातून सर्व प्रथम आल्याबद्दल डॉ. चंद्रभान वेदालंकार स्मृती पारितोषिक व हिंदी अभ्यास मंडळ , प्रस्तुत विद्यापीठ रोख पारितोषिक प्राप्त केले. तसेच कु.अक्षता बालाजी देवकते हिने इंग्रजी ऐच्छिक विषयात विद्यापीठातून सर्व प्रथम येऊन स्व. श्री. टी. मल्लीकार्जुन राव स्मृती प्रित्यार्थ पारितोषिक प्राप्त केले. याबरोबरच राज्यशास्त्र विषयात कुरेशी माजिद अमिरोद्दीन व कु. राजश्री पंडितराव गुट्टे यांनी समान गुण प्राप्त केल्याबद्दल यांना विभागून नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जि. परभणी चे प्राचार्य द. रा. कुलकर्णी सुवर्णपदक व स्वातंत्र्य सेनानी कै. दिपाजी पाटील सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या लौकिकात भर टाकली.
या गुणवंत विद्यार्थ्यांना
स्वा. रा. ती. म. वि. नांदेडचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी,प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ. आनंद बारकुते राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. शिवराज बोकाडे आदिंच्या हस्ते रोख पारितोषिक व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील ,हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. एन. यु. मुळे, डॉ. पी. डी. चिलगर , इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.ए. सी. आकडे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.पी.चौकटे आदी उपस्थित होती.
सुवर्ण पदक व रोख पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील , उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांनी तसेच सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.