महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने आयोजीत केलेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागरबाई जाभाडे या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील,प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के पाटील,पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ,रिपाई राज्यसचिव बाबासाहेब कांबळे,युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,डाॅ.ओ.एल. किनगांवकर,प्राचार्य एम.बी वाघमारे,शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड,दत्तोबा कांबळे,शेख अय्याजभाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्या नंतर पुतळा समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी त्रीशरण पंचशिलाचे पठण केले.त्यानंतर अभिवादन सभा संपन्न झाली.
या सभेत बोलताना माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की,या जगात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथले हजारो वर्षाचे प्रश्न सोडविले आहेत.त्यांचे मोठेपण आपण जपले पाहीजे.
गणेशदादा हाके बोलताना म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून सर्व सामान्यांना अधिकार बहाल करण्याचे ऐतिहासिक काम केले असल्याने त्यांचे नांव अजरामर आहे असे प्रतिपादन केले.
युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी बोलताना म्हटले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलित उपेक्षीत,वंचित वर्गाच्या उत्थानासाठी अनमोल असे कार्य केले असुन या रक्त विरहित क्रांतीची नोंद ऐतिहासिक अशा स्वरूपाची असुन बाबासाहेबांचे विविध पैलू समाजापूढे आणून या पैलूंवर अभ्यास केल्यास बाबासाहेबांचे मोठेपण लक्षात येईल असे प्रतिपादन केले.
तर रिपाई नेते बाबासाहेब कांबळे म्हणाले की,
भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत केली असून भारतीय समाजावर बाबासाहेबांनी संविधाच्या माध्यमातून उपकराच केले आहेत असे प्रतिपादन केले.
पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ,डाॅ.ओ.एल. किनगांवकर यांचीही समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर यांनी केल.तर आभार युवानेते प्रशांत जाभाडे यांनी केले.
या वेळेस माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय भालेराव,शिवाजीराव भालेराव,भिमराव कांबळेसर,संगमेश्वर बनसोडे,अमजद पठाण, इमरोज पटवेगर,संजय माळी,शरद सोनकांबळे, चंद्रकांत कांबळे,सचिन बानाटे शरद कांबळे,रवी गायकवाड, योगेश जाभाडे आदींनी पुढाकार घेतला.