सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल CBSE स्कूल रुद्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल CBSE स्कूल रुद्धा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट एज्युकेशन कॅम्पस मध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल CBSE स्कूलच्या येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक कुलदीप हाके व संचालिका शिवाली हाके यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शर्वरी घाडगे, पृथ्वीराज, कृष्णा माने,वेरोनिका अल्हाट ,यशस्वी वारलवाड, महिमा आल्हाट इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका शिवलिका हाके व प्राचार्य ऋत चक्रनारायण यांच्या हस्ते विजेत्यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवाली हाके, प्राचार्य ऋत चक्रनारायण, भरत कानवटे, शुभांगी सूर्यवंशी, दीपक बिरादार, सय्यद नवाल ,मलकानी निजमुद्दिन, वैजनाथ धुळगुंडे तसेच केशव तोंडारे , अनंत उदगिरे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बिरादार तर आभार नवाल सय्यद यांनी मांडली.

About The Author

error: Content is protected !!