अहमदपूर भाजपाच्या वतीने शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर – चाकूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहमदपूर येथे महावितरण कंपनीच्या विरोधात व महाआघाडी सरकारच्या विरोधात रस्ता-रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे रस्ता रोको आंदोलन शिवाजी चौक अहमदपूर येथे करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे नेते विनायकराव पाटील साहेब प्रदेश उपाध्यक्ष भाजपा दिलीपराव देशमुख (मालक) प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा भाजपा गणेश दादा हाके पाटील प्रदेश प्रवक्ते अशोक काका केंद्रे जिल्हा सरचिटणीस श्रीमती दाभाडे ताई सभापती प स ,मा.श्री बालासाहेब गुट्टे उपसभापती सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी हनुमंतराव देवकाते तालुकाध्यक्ष भाजप दत्तात्रय जमालपुरे सरचिटणीस अहमदपूर तालुका प्रतापराव पाटील सरचिटणीस भाजपा परमेश्वर पाटील उपाध्यक्ष दत्ता गोरे उपाध्यक्ष राम चव्हाण काशिनाथ वडजकर श्री नाथराव खांडेकर दत्ता खंदाडे व असंख्या भाजपा कार्यकर्ते हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव या रस्ता रोको कार्यक्रमाला उपस्थित होते या रास्ता रोको ला संबोधित करत असताना दिलीप देशमुख यांनी या आघाडी सरकारचा सर्वप्रथम निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांची वीजजोडणी त्वरित करण्यात यावी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुर्णपणे मार्गी लावा नाहीतर याच्या पुढे जाऊन आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आघाडी सरकारला दिला.