भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्यामलाल हायस्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्यामलाल हायस्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पण

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, अथांग ज्ञानाचा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बोधिसत्व, “शिका संघटित व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ” असा संदेश मानवजातीला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच प्रवीण भोळे, संजय देबडवार, मुक्कावार वनमाला, चव्हाण बालाजी, उमाकांत सूर्यवंशी, बोळेगावे दिनेश इ. शिक्षक, शिक्षिकांनी महामानवास श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती माननीय मुख्याध्यापक आनंद चोबळे सर यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उमाकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!