बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेमुळे देशात सामाजिक समता रुजली – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेमुळे देशात सामाजिक समता रुजली आश्या शब्दात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी बालाघाट तंत्रनिकेतन व आयटीआय, अहमदपूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बोलताना आपली राज्यघटना घडवण्यात डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. असे मत भाजपाचे प्रवक्ते तथा संस्थेचे अध्यक्ष गणेश हाके यांनी मांडले. यावेळी हनमंत देवकत्ते ता. अध्यक्ष भाजपा, बाळासाहेब होळकर जि.चिटणीस भाजपा,दत्तात्रय जमलपूरे ता. सरचिटणीस भाजपा, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, आयटीआयचे प्राचार्य मदन आरदवाड, कालिदास पिटाळे, संग्राम कोपनर, सुहास दहीटनकर, महेश स्वामी, आरती पुणे, सचिन आडे, समीर कुरेशी, तोहीद शेख, रूपा पाटील, श्रुती मेनकुदळे, गणेश एमगीर, संतोष लातूरे, विजय पांचाळ, मंगेश चव्हाण, सतीश केंद्रे आदी कर्मचारी उपस्थित होते.