दयानंद कला महाविद्यालयात जलस्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
लातूर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दयानंद कला महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे डॉ संदीपान जगदाळे यांनी प्रतिमा पूजन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने आंबेडकरी जलसाचे सादरीकरण करण्यात आले. सर्वप्रथम भीम वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर डॉ आंबेडकर यांनी बालपणात जातीयतेचे दाहक चटके कसे सहन केले ? हिंदू कोड बिल, काळाराम मंदिर प्रवेश याचबरोबर माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब यांच्यासाठी दिलेले योगदान, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश व बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आदी विषयांवर पंधरा मिनिटाच्या आंबेडकरी जलसातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
या जलशात प्रियंका बनसोडे,ज्योतिबा बडे, अनमोल कांबळे, कु.शितल अल्टे, सुदाम साठे, श्रीनिवास बरिदे, राहुल जावळे, अधिराज जगदाळे, आद्वैत जैन, योगेश पोटभरे यांनी सहभाग नोंदविला. यांना हार्मोनियमची साथसंगत कु.अश्विनी मेटे हिने केली तर ढोलकीची साथ अनंत खलुले याने केली.जलशासाठी डॉ देवेंद्र कुलकर्णी व डॉ संदीपान जगदाळे याचे मार्गदर्शन लाभले. अभिवादन कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.