राष्ट्रीय समाज पक्षाकडे तरुणांचा ओढा – बोडके

राष्ट्रीय समाज पक्षाकडे तरुणांचा ओढा - बोडके

उदगीर ( प्रतिनिधी ) : लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्याला गती आली असून विविध संघटना आणि राजकीय पक्षातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लहूजी आर्मी संघटना आणि एल्गार सेना मध्ये काम करणाऱ्या समाजसेवी संघटनेतील बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी रासपचे जेष्ठ नेते परमेश्वर पटवारी, राज गायकवाड, परमेश्वर सोमवंशी, उद्धव गायकवाड, बबन फड, सचिन पटवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवा नेते युवा जिल्हाध्यक्ष नागनाथ भाऊ रामराव बोडके यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांना पक्षाचं गमच्या घालून आणि सत्कार करून पक्ष प्रवेश दिला. युवा कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय धोरणे, सामाजिक कार्याबद्दल मार्गदर्शनही केले.गोरगरिब ,कष्टकर्‍यासाठी,उपेक्षितासाठी प्रामुख्याने कार्य करावे.लोक कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोंहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

About The Author