महापरिनिर्वाण दिनानिमित्त 103 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
लातूर (प्रतिनिधी) : डॅा.बाबांसाहेब आंबेडकर जंयती महोत्सव समिती २०२१ समितीचे अध्यक्ष निखिल गायकवाड, संजीवनी ब्लड सेंटरचे चेअरमन विशालजी सावंत, समितीचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चांगल्या प्रतिसादात शिबीर संपन्न झाले. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्त साठा होऊ शकला नव्हता. आरोग्यामध्ये रक्त ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे रक्ता मुळेच जीवदान लाभू शकतं आणि म्हणूनच रक्तसाठा वाढ होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत शिबिरासाठी लोकांना आवाहन केल्यानंतर रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच हे महत्कार्य होऊ शकले. या रक्तदान सोहळा शिबिरास अनेकांचे हातभार लागले त्यातूनच 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भन्ते पय्यानंद , चंद्रकांत चिकटे, अनंत लांडगे, अशोक कांबळे, राहुल कांबळे, अतिश चिकटे, मायाताई कांबळे, लाला सुरवसे, नवनाथ आल्टे, रणधीर सुरवसे, राहुल बनसोडे, शैलेश भडीकर, प्रमोद आडसुळे, अतिश कांबळे या सर्वांच्या परिश्रमातून हे शिबीर संपन्न झाले.