“करिअर कट्टा” या उपक्रमाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण संपन्न

"करिअर कट्टा" या उपक्रमाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात मंगळवार दि. 7 डिंसेबर रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. करिअर कट्टा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात येणार असून यात “IAS आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई, तथा संपूर्ण भारतात कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे तसेच उद्योजकीय कौशल्य वाढीसाठी “उद्योजक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या बँकांचे प्रतिनिधी, प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, विविध तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
करियर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व औद्योगिक क्षेत्रांमध्ये विविध संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाविद्यालयाचा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी केले.

करिअर कट्टा विभागाच्या फलकाचे अनावरण डॉ. संतोष गजानन रजनी पाठारे, प्रसिद्ध सिनेमा तज्ञ् व समीक्षक, सचिव-प्रभात चित्र मंडळ, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, करिअर कट्टा संयोजक डॉ शिवकुमार राऊतराव, प्रा.विवेक झंपले, डॉ.सुभाष कदम, डॉ.संदिपान जगदाळे, प्रा.विलास कोमटवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author