खून करण्यापूर्वी त्यांनी जंगलात केला होता गोळीबारचा सराव, गोल्डमॅन खूनप्रकरणी दोघांना अटक
पुणे ( रफिक शेख ) : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या हद्दीत भरदिवसा गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणातिल तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले यातील एक आरोपी अल्पवयीन आहे दिवसाढळया झालेल्या या हत्याकांडाने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान खून करण्यापूर्वी आरोपीने एका जंगलात जाऊन गोळीबारचा सराव केला असे तपासात समोर अले आहेआरोपी हे समीर च्या मागावरच होते समीर घरातून बाहेर पडल्या नंतर आरोपी त्याचा पाठलाग करत होते त्यानंतर तो चहा पिण्यास आंबेगाव बुद्रुक येथे चंद्रभागा चौकात आल्यानंतर पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या सहा गोळ्या घालून त्याला मारण्यात आले होते.त्यानंतर हे आरोपी तेथून पसार झाले होते. त्याचा शोध घेण्यत येत होता
त्या दरम्यान मुख्य आरोपी मेहबूब बलुरंगी बाबत माहिती मिळाली त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता इतर आरोपी हे कोरेगाव पार्क येते लपल्याचे समजले त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना या सर्वाना ताब्यात घेतले.
मेहबूब सैफान बलुरंगि(वय 33,रा जनता वसाहत ) नीलेश सुनील कुंभार (वय 30)सुफियान फ़ैयाज़ चोरी(वय19)अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर त्यांच्या 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत समीर उर्फ़ लालबदशाह हुसेनसाब मनुर ( वय 32) याच खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत समिरची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणुन नुकतीच नियुक्ति झाली होती. काही दिवसापूर्वीच त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे आमदार संजय जगताप त्यांच्या हस्ते उदघाटन देखील झाले होते.सोमवारी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दी तिल आंबेगव परिसरात त्याचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला आर्थिक वादातून हा खून करण्यात आला.